सोमवार, २२ एप्रिल, २०१९

हास्य तुझे कसे सखे ° ° °!

हास्य तुझे कसे सखे °°°°°°°°°°°°°!!


हास्य तुझे कसे सखे
मनी हे धुडघूस घालते
मन बावरे होते का कधी
ह्रदयी काहूर हे दाटते

नयनीच बोल अगढ सारे
बेधुंद प्रीतीचे गुढ इशारे
तुझ्या उष्ण या श्वासांनी
उठती अंगावरती शहारे

चालने तुझे बोलने हे
सारे संस्कारी लक्षणे
केशवेनी रूळे पाठी
जनु ते रेशमी बंधने 

तु उशा गव्हाळ वर्णी
केतकी जशी सुगंधी
मधाळ तुझे गोड अधर
तु प्राजक्ताची फांदी 

स्पर्श तुझा जनु पर्वनी
श्रावण सरीत चिंब भिजने
घायाळ करी मला हे 
 तुझे जीवघेणी लाजनं

           -प्रशांत पाटील सोमवंशी 
               9011574728

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: